टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि व्हीनस विलियम्स ह्या बहिणींच्या सदाबहार कामगिरीचे आपण सगळे चाहते आहोत. आता ह्यातील सेरेना विलियम्स बद्दल एक आनंदाची बातमी आली आहे. अमेरिकन स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि व्यावसायिक अॅलेक्सिस ओहानियान यांचा विवाह थाटामाटात पार पडला. दक्षिण अमेरिकेतील कंटेम्पररी कला केंद्र न्यू ओरलेंस या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात 250 लोकांनी हजेरी लावली होती. सेरेना आणि अॅलेक्सिस यांनी 30 डिसेंबर 2016 रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच सेरेनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला सेरेना आणि अॅलेक्सिस ह्यांना अडीच महिन्यांची मुलगी आहे. 23 ग्रैंडस्लैम आणि चार ऑलिम्पिक सुवर्णपदांची मानकरी असणारी सेरेना आजवरची सर्वात प्रभावशाली महिला टेनिसपटू आहे. गर्भवती असतांना सुद्धा ती ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये खेळली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews